रशियन वृत्तवाहिनी एसव्हीआर टेलिग्रामनं अलीना कबाएवा ही पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याची बाती दिली आहे. पुतीन रशियाच्या विजय दिवसाची तयारीचा आढावा घेत असताना त्यांना ही बातमी देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुतीन यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी अद्याप अलीना कबाएवा हिच्याशी असलेल्या संबंधाचा अधिकृत स्वीकार केलेला नाही. अलीना ही रशियातील एका माध्यमाची प्रमुख आहे रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धामुळं रशियावर आर्थिक बंधन घलाण्यात आली आहेत.
अलीना हिनं आलिम्पिक स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतला होता. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर अलीना कबाएवा हिनं राजकारणात प्रवेश केला होता. व्लादिमीर पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीकडून ती खासदार म्हणून निवडून देखील आली होती. अलीन हिनं गायिका होण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र तिला यश आलं नव्हतं. 2014 मध्ये अलीना काबएवा हिला नॅशनल मीडिया ग्रुप ऑफ रशियाचं चेअरमनपद देण्यात आलं आहे.
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्याती युद्धाला अडीच महिने पूर्ण होत आले आहेत. रशियानं यूक्रेनच्या नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. रशियानं यूक्रेनविरुद्ध २४ फेब्रुवारीला युद्ध सुरु केलं होतं. रशियानं यूक्रेन विरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर राजधानी कीव लवकर ताब्यात येईल, अशी आशा होती. मात्र, पूर्व यूक्रेन वगळता रशियाला इतर भागातून माघार घ्यावी लागली आहे. रशियाचं देखील यूक्रेन युद्धात मोठं नुकसान झालं आहे.