४५ वर्षीय पिया मुखर्जी यांच्यावर आकाश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. युरोलॉजी विभागाचे एचओडी डॉ. विकास अग्रवाल यांनी सांगितले की, ‘महिलेला काही दिवसांपासून पायात दुखत होते. थकले होते आणि वजन कमी होत होते. औषधानेही काम केले पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही. तपासणीअंती महिलेची किडनी निकामी झाली असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे आढळून आले’. आईची ही अवस्था पाहून फक्त मुलगाच किडनी दानासाठी पुढे आला. डॉक्टरांनी सांगितले की, या प्रकरणात आईने अविवाहित मुलाकडून किडनी घेणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.
मुलाकडून ‘किडनी’ मिळाल्यानंतर आईने सांगितले की, ‘मी व्यवसायाने नृत्यांगना असून ‘किडनी’ निकामी झाल्यामुळे पुन्हा नृत्याचे दिवस येतील की नाही याची मला खात्री नव्हती. आई असल्यामुळे माझ्या मुलाकडून ‘किडनी’ मिळणे हा माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता. पण तो किडनी दान करण्याबाबत अगदी तयार होता. त्याने बाकी सर्व विचार नाकारले, कारण त्याला माझा जीव वाचवायचा होता. माझा जीव वाचवणे ही त्याची प्राथमिकता होती’. त्यानंतर अभिनव म्हणाला की, ‘माझ्यासाठी माझ्या आईचा जीव वाचवण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही’.
दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मुली किंवा महिलाच अवयव दान करण्यासाठी पुढे असतात. अवयव दान करणाऱ्यांमध्ये सुमारे ७५% महिला आहेत. आई-वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी फार कमी तरुण मुले अवयव दान करण्यासाठी पुढे येतात.