पुणे : शिवसेना आपल्या जुन्या मूडमध्ये आलेली आहे. त्यांची दादागिरी सुरू आहे. शिवसेनेला आता जनताच पाहून घेईल ते सत्तेत आहेत, हे शिवसेना विसरली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केलेली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

नवनीत राणा यांना उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना सांगायचं होतं. नवनीत राणा यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती. ते हनुमान चालीसा म्हणणार होते रावण चालीसा नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. तर या सर्वांवरून शिवसेना त्यांच्या जुना मूडमध्ये आली आहे. त्यांची दादागिरी सुरू आहे, असा घणाघात देखील समाधान पाटील यांनी केला आहे.

मला जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला – शरद पवार

दरम्यान, राज्यातला पोलिसांकडे तक्रार देऊन काय अर्थ नाही. त्यांच्याकडे तक्रार देईपर्यंत जरा चार-पाच फोन येतात. त्यामुळे न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात असेही ते म्हणाले. दुसरीकडे, १४ तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्या सभेवर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंधरा तारखेला देवेंद्र फडणवीस सभा होणार आहे त्यात ते उद्धव ठाकरे यांच्या सभेला देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आषाढी वारीची तारखी ठरली, यंदा कसं असणार पालखी सोहळ्याचं नियोजन? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here