रत्नागिरी ताज्या बातम्या: NIA कारवाईतून मोठ्या नेत्यांची नावं उघड होणार, भाजप नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ – bjp leader prasad lad claims that nia action will reveal the names of big leaders
प्रसाद रानडे, रत्नागिरी : एनआयएच्या मुंबईत पडलेल्या धाडीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सूचक विधान केलं आहे. नवाब मलिक यांच्या चौकशीतूनच एनआयएच्या या पुढील कारवाया झाल्यात. एनआयएच्या कारवाईतून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पुर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील, असा घणाघाती आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
लिलावती हॉस्पीटलमध्ये नवनीत राणा यांच्या एआरआय रिपोर्टमधल्या फोटोसंदर्भात जाब विचारणाऱ्या माजी महापैर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे. चमचेगिरी किती करावी आणि किती वेळ करावी याला मर्यादा. हिच चौकशी करोना काळात केली असती तर महाराष्ट्राला ते आवडलं असतं. महापालिकेच्या दवाखान्यात किती भष्ट्राचार झाला हे जाहीर करावे आणि हे थोटांड बंद करावे असा शब्दात प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. शिवसेना आपल्या जुन्या मूडमध्ये आली आहे, चंद्रकांत पाटीलांची खोचक टीका सरकारी वकील प्रदिप घरत हे सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करतायत. त्यांची पंतप्रधानाबद्दल केलेली वक्तव्य खेदजनक होती. नवनीत राणा यांना विशिष्ठ विषयावर माध्यमांशी बोलू नये अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. सरकारमधील मंत्री नेते आणि सरकारी वकील यंत्रणा बनून राणा दांपत्याला अडकवण्याचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतो अशी भुमिका नवनीत राणा यांना तुमचा जामिन रद्द का करू नये अशा दिलेल्या नोटिसी संदर्भात प्रसाद लाड यांनी आपली भुमिका सष्ट केली.
१४ मेच्या शिवसेनेच्या सभेवरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे. हुनकार कि खुनकार याचं उत्तर आम्ही मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून देवू. स्वतःच्या तोंडावरचा मास्क काढून जनतेत दाखवण्याचे धैर्य मुख्यमंत्र्यांनी दाखवावं. हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून जनतेच्या समोर जावं लागतं. हिंदुत्वाचा हुनकार आम्हाला दाखवू नये असं आव्हान प्रसाद लाड यांनी थेट शिवसेनेला दिलं आहे.