ठाणे : उल्हासनगरात एका मोबाईलच्या दुकानात छत फोडून चोरी करण्यात आली आहे. यामध्ये चोरट्याने तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे आयफोन चोरून नेले. मात्र, मध्यवर्ती पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून १८ लाख १८ हजार रुपयांचे फोन हस्तगत केले आहेत.

१८ लाख ७२ हजार रुपयांचे फोन केले लंपास…

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साऊंड ऑफ म्युझिक नावाचे मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात रविवारी ८ मे रोजी पहाटे ५ च्या सुमारास एक चोरटा छत फोडून आत घुसला. यानंतर त्याने दुकानातले तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे फोन चोरून नेले यामध्ये प्रामुख्याने आयफोन मोबाईलचा समावेश होता. यानंतर हा चोरटा उल्हासनगर रेल्वे स्थानकात गेला. तिथे रेल्वेच्या प्रसाधन गृहात त्याने चोरलेल्या मोबाईलची बॅग लपवली आणि प्लॅटफॉर्मवरच झोपला. दुसरीकडे दुकान मालकाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत या चोरट्याचा माग काढायला सुरुवात केली.

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, सूर्यकुमार यादव आता आयपीएलमधूनच बाहेर, पाहा काय घडलं
काही वेळात चोराला ठोकल्या बेड्या…

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बीटमार्शल अशोक मोरे आणि राजेंद्र कोगे या दोघांनी गस्तीवर असताना त्याला पकडले. महमद फिरोज नईम अहमद, असं या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या मोबाईल्स पैकी १८ लाख १८ हजार रुपयांचे फोन हस्तगत केले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वेगवान तपासाबद्दल उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस नाईक अशोक मोरे आणि पोलीस शिपाई राजेंद्र कोगे यांचं ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी अभिनंदन करत त्यांना बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस उपयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

मला जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला – शरद पवार
आधीही केली होती अशी चोरी…

दरम्यान, चोरटा महमद फिरोज नईम अहमद याने यापूर्वी २ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्री अंबरनाथ नगरपालिकेजवळच्या राजेश मोबाईल्स या दुकानात अशाच पद्धतीने चोरी केली होती. या दुकानाचे पत्रे फोडून छत तोडून त्याने दुकानात प्रवेश केला होता. त्यावेळीही त्याने १४ लाख रुपयांचे मोबाईल चोरले होते. ज्यामध्ये आयफोन मोबाईलचा प्रामुख्याने समावेश होता. त्या प्रकरणात त्याला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर २२ एप्रिल २०२२ रोजी त्याची जामिनावर सुटका झाली.

Smartphone Offers: Xiaomi चा ३२ हजारांचा ५जी फोन फक्त ५ हजारात खरेदीची संधी, फीचर्स एकापेक्षा एका शानदार
चोरटा दुबई रिटर्न…

त्यानंतर अवघ्या १६ दिवसात त्याने पुन्हा एकदा उल्हासनगरच्या साउंड ऑफ म्युझिक दुकानात चोरी केली. आरोपी महमद फिरोज नईम अहमद हा तिसरी पर्यंत शिकला असून त्याचे शौक मात्र मोठे आहेत. अंबरनाथच्या मोहन नॅनो इस्टेट या पॉश सोसायटीत तो राहतो. आत्तापर्यंत तो ३ वेळा दुबई फिरून आला आहे. दुबईत अमली पदार्थ विकताना त्याला पकडण्यात आलं होतं. अंबरनाथच्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्यावेळी त्याच्याकडून वैयक्तिक वापरातले दोन आयफोन, एक आयपॅड, एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला होता. त्यामुळे महमद फिरोज नईम अहमद हा अल्पशिक्षित पण शौकीन चोरटा असल्याचे समोर आले आहे.

अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत सगळी माहिती ओम बिर्लांना दिली : नवनीत राणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here