सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरु असलेल्या छापेमारीनंतर एनआयएने चौकशीसाठी खंडवानी यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे छोटा शकिलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड इथून एनआयएने ताब्यात घेतलं. तर माहिममधून छोटा शकिलशी संबंधित मोबिडा भिवंडीवाला या महिलेला एनआयएने ताब्यात घेतलंय. तसंच पायधुनी भागातल्या एका ७१ वर्षीय व्यक्तीच्या घरीही एनआयएने छापेमारी केली आहे. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे.

 

nia raid 29 location in mumbai connected to dawood ibrahim gang
मुंबईत आज सकाळपासूनच एनआयएची छापेमारी

हायलाइट्स:

 • मुंबईत NIA चं ऑपरेशन ‘डी गँग’
 • मुंबईतल्या 29 ठिकाणी छापेमारी
 • अनेक जण चौकशीसाठी ताब्यात
मुंबई : मुंबईत आज सकाळपासूनच एनआयएने छापेमारी सुरु केली. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहमशी संबंधित असलेल्या संशयावरुन मुंबईत २९ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली. दिवसभरात पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे. माहिम भागात एनआयएने ४ ठिकाणी छापेमारी केली. छोटा शकिलचा साडू सलीम फ्रूटला एनआयएने ताब्यात घेतलंय तर सोहेल खंडवानीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. माहिम दर्ग्याचे विश्वस्त असलेले सोहेल खंडवानी यांच्या मालमत्तेवरही एनआयएने छापेमारी केली.

सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरु असलेल्या छापेमारीनंतर एनआयएने चौकशीसाठी खंडवानी यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे छोटा शकिलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड इथून एनआयएने ताब्यात घेतलं. तर माहिममधून छोटा शकिलशी संबंधित मोबिडा भिवंडीवाला या महिलेला एनआयएने ताब्यात घेतलंय. तसंच पायधुनी भागातल्या एका ७१ वर्षीय व्यक्तीच्या घरीही एनआयएने छापेमारी केली आहे. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे. दाऊदशी संबंधित ड्रग्ज पेडलर, शार्प शुटर आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

NIA Raids: मुंबईत एनआयएची मोठी कारवाई; नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी
मुंबईत NIA चं ऑपरेशन ‘डी गँग!’

 • मुनाफ मोहम्मद युसूफ शेख, लिली अपार्टमेंट, अंबोली
 • सुरेश शेट्टी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ओशिवरा
 • आतिफ शेख, प्लुटो बिल्डिंग, ओशिवरा
 • फिरोज हमीद शर्मा, हिल रोड वांद्रे
 • गुड्डू पठाण, बाब इब्राहिम बिल्डिंग, माझगाव
 • मन्नत हावरा, बंगालीपुरा, अॅन्टॉप हिल
 • मोहम्मद सलीम अब्दुल्ला उर्फ सलीम फ्रुटवाला, नागपाडा
 • अस्लम पठाणी, डीसीबी बँक बिल्डिंग, डोंगरी
 • अजय गोसालिया, डिलाईट बिल्डिंग, वांद्रे
 • कय्युम शेख, माहिम
 • सोहेल खंडवानी, माहिम

dawood ibrahim : दाऊदच्या टार्गेटवर मुंबई आणि दिल्लीतील बडे नेते, NIA ची धक्कादायक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे अनेक साथीदार, शार्प शूटर आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर हा छापा टाकला गेला. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी भागात छापे टाकले गेले. या छाप्यात अनेक हवाला ऑपरेटर, ड्रग्ज तस्कर यांच्यासह डी-गँगशी जवळचे संबंध असलेल्या अशा अनेक लोकांवर छापे टाकण्यात आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएच्या छाप्यांसंदर्भात दिवसभर मुंबईत चर्चा ऐकायला मिळाली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nia raid 29 location in mumbai connected to dawood ibrahim gang
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here