गुवाहटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)आज आसामच्या दौऱ्यावर होते. गुवाहटी येथील कार्यक्रमात अमित शाह यांनी आगामी जनगणनेबद्दल (Census) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पुढील जनगणना ही शास्त्रीय होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं अमित शाह यांनी जाहीर केलं. पुढील जनगणना ही ई-जनगणना (E-Census)असेल. संपूर्ण जनगणना ही ऑनलाईन पद्धतीनं केली जाईल आणि ती 100 टक्के अचूक असेल, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

NIA कारवाईतून मोठ्या नेत्यांची नावं उघड होणार, भाजप नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ
आसामची राजधानी गुवाहटीमधील अमीगावमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत आसामच्या जनगणना संचलनालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. देशाच्या विकासासाठी योग्य जनगणना आवश्यक असल्यंच अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

अमित शाह यांनी पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल, ती 100 टक्के अचूक असेल आणि त्याच्या आधारावर भारताच्या पुढील 25 वर्षाच्या विकासाची योजना राबवली जाईल, असं अमित शाह म्हणाले. आगामी जनगणनेबद्दल बोलताना अमित शाह यांनी अधिक माहिती दिली. मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर त्याचं नाव जनगणनेत नोंदवलं जाईल. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल. व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्याचं नाव वगळण्यात येईल. नव्या जनगणनेत पत्ता आणि नाव बदलण्यासाठी सोपी प्रक्रिया असेल, असं म्हटलं आहे.
गुणरत्न सदावर्तेंना गांधीवादाची अ‍ॅलर्जी तर नथुरामला संबोधलं ‘गोडसेजी!’
अमित शाह यांनी जन्म आणि मृत्यू रजिस्टर जनगणनेशी जोडणार असल्याचं म्हटलं. 2024 पासून प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाईल, ती देशाच्या जनगणनेत नोंदवली जाईल, असंही ते म्हणाले. देशाच्या आगामी 25 वर्षांची विकासाची योजना बनवण्यासाठी आपल्याला धोरण ठरवण्यास ई जनगणनेची मदत होईल, असं अमित शाह म्हणाले. ई-जनगणनेत सर्वप्रथम मी आणि माझ्या कुटुंबीयांची माहिती भरुन करणार असल्याचं शाह म्हणाले.

अमित शाह यांनी धोरण ठरवण्यामध्ये जनगणना महत्त्वाची असते. अचूक जनगणना ही विकासाचं धोरण आणि एससी आणि एसटी समाजाची स्थिती काय आहे हे दाखवून देते. ग्रामीण, शहरी आणि डोंगराळ भागत वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनशैली देखील आपल्याला जनगणनेतून समजते, असं अमित शाह म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here