श्रीलंकेत ठिकठिकाणांहून हिंसेच्या घटनांची माहिती समोर येत आहे. आंदोलकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि इतर नेत्यांच्या घरांना पेटवून दिलं आहे. महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलकांनी घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या खासदाराचा आंदोलकांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. तर, 150 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळं श्रींलकेत अंतर्गत गृहयुद्ध सुरु झालंय की काय अशा चर्चा आहेत.
श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोलंबेमध्ये सैन्याला तैनात करण्यात आलं आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना आणि सरकार समर्थकांना दूर कर ताना दिसून आले. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या देखील फोडल्या. सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाल्याचं दिसून आलं आहे. महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य सनथ निशांत यांचं घर पेटवून देण्यात आलं आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला असून 150 लोक जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी आंदोलकांचा विरोध करण्यासाठी ग्रामीण भागातून लोक आलणले होते. महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी 3 हजार लोकांना संबोधित केलं. राष्ट्रहितासाठी राष्ट्राचं संरक्षण करणार असं महिंदा राजपक्षे म्हणाले. यानंतर राजपक्षे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांचा तंबू उखडून टाकला, यानंतर दोन्ही गट भिडले असल्याची माहिती आहे. श्रीलंकेत राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.