त्यामुळे आरोपींवर देखरेख करण्यासाठी नवी मुंबई पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तावर नेमण्यात आले. पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास प्रदीप शौचालयात गेला. शौचालयातील खिडकीच्या काचा व लोखंडी सुरक्षाजाळी काढून खिडकीला लागून असलेल्या पाइपच्या साहाय्याने खाली उतरून पलायन केले. बराच वेळ होऊन गेल्यानंतर तो बाहेर न आल्याने पोलिसाने त्याला आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पोलिसाने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांना बोलावून घेतले. यानंतर त्यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने शौचालयाचा दरवाजा तोडला. यावेळी प्रदीपने खिडकीतून पलायन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रदीपचा आजूबाजूच्या परिसरात, तसेच रेल्वे स्थानकावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर सर जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
Home Maharashtra शौचालयाला जाण्याचा बहाणा करून तळोजा कारागृहातील आरोपीने केलं पलायन – accused escapes...
शौचालयाला जाण्याचा बहाणा करून तळोजा कारागृहातील आरोपीने केलं पलायन – accused escapes from taloja jail latest updates
नवी मुंबई : तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या व उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलेल्या एका कैद्याने शौचालयाला जाण्याचा बहाणा करून खिडकीतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली. प्रदीप रामाजू पाल (३०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.