विकास मिरगणे, नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून अत्यावश्यक सर्व चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्रदिनी ही सेवा सुरू होणार, अशी आशा नवी मुंबईकरांना होती. मात्र, सिडकोला मेट्रो सेवा शुभारंभासाठी मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे मुहूर्तासाठी तारीख पे तारीख चर्चा सुरू आहे. मेट्रो उद्घाटनासाठी सिडको प्रशासकांनी नगर विकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक केव्हाही लागू शकतात. यादृष्टीने मेट्रोचे उद्घाटन केले जाईल. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०११ सुरू केले आहे. उद्घाटन प्रसंगी २०१४ मध्ये मेट्रो धावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, अनेक विघ्न आल्याने काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने गतवर्षी प्रकल्पाची देखभाल व प्रकल्प सुरू करण्याचे काम महामेट्रोला दिले. राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत खलबतं? सप्टेंबर महिन्यात वेग आणि इतर प्रमाणपत्र दिले गेले. एप्रिल महिन्यात रेल्वे सुरक्षा मंडळाकडून पत्रही प्राप्त झाले आहे. ११ किमीसाठी ११ वर्षे प्रतीक्षा बेलापूर ते पेंधर हा अकरा किमीच्या मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ २०११ साली करण्यात आला. मात्र, त्यानंतर कामात अनेक विघ्ने आली. सिडकोने महामेट्रोचे नियुक्ती करून पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान पहिल्या टप्पा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या.