पुणे : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर दुबई येथून आलेल्या प्रवाशांकडून तब्बल २६ लाख ४५ हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. मागील दोन-तीन वर्षात दुबई येथून कच्च्या सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. दुबई येथून आलेल्या प्रवाशांकडून २४ कॅरेटचे ५०० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि चैन जप्त केले आहेत.
प्रवाशांकडून सर्व सोने जप्त करण्यात आले असून प्रवाशासह त्याला विमानतळावर घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.