लखनौ :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कडाडून विरोध केला आहे. खासदार सिंह यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात आज नंदिनी नगर येथे रॅली काढत उघड आव्हान दिलं आहे. यावेळी बृजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज यांचा अयोध्या दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मशिदीच्या भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम देत राज ठाकरे यांनी राज्यातील वातावरण ढवळून काढलं होतं. तसंच राज यांनी आपण ५ जून रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र राज ठाकरें यांनी आधी परप्रांतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, असा इशारा खासदार बृजभूषण शरण सिंह (Bjp Mp Brij Bhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

Sri Lanka Violence: श्रीलंकेत हिंसाचार थांबेना; जमावाकडून खासदाराची हत्या, राजपक्षेंचे घर पेटवले

भाजपच्या इतर नेत्यांनी बृजभूषण सिंह यांना समज दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र तरीही सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध कायम ठेवला आहे. तसंच आज तर थेट आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून खासदार सिंह यांनी राज यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे उत्तर प्रदेशात गेल्यास त्यांचा भाजप खासदारासोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह ठाण्यातील सर्व विभाग अध्यक्षांची एक बैठक मुंबईत पार पडली. यानंतर नेते मंडळींचे एक शिष्टमंडळ लवकरच तयारीसाठी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे.

3 COMMENTS

  1. If this trial meets its goals, will women with DCIS someday be able to use tamoxifen gel to avoid or delay surgery buy cheap propecia uk Collagen and elastin levels green line peak around 30 35 years of age then decline following the decrease in 17ОІ estradiol levels

  2. It s the reason why there is more prize money in French racing, but the lottery numbers game image of the QuintГ© today Find the first 3, 4 or 5 has destroyed racing in France as a sport cocaine and viagra

  3. Cruciferous vegetables are rich unique sources of glucosinolates, whose hydrolytic products, primarily isothiocyanates ITCs and indoles, may have cancer chemopreventive properties order cialis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here