मुंबई : स्टार किडसवर नेहमीच फोटोग्राफर्सचे कॅमेरे रोखलेले असतात. त्यात सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर हा कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतो. तैमूरच्या शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सैफ आणि करिना आवर्जून जातात. तैमूरचे फोटो आणि व्हिडिओही करिना तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. पाच वर्षाच्या तैमूरच्या फोटो आणि व्हिडिओला चाहते कमेंट करत असतात.

तैमूर

आता पुन्हा एकदा तैमूरभोवती प्रसिद्धीचं वारं वाहू लागलं आहे. तैमूरमुळे त्याच्या सेलिब्रिटी आईवडील सैफ आणि करिनाला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली आहे. तैमूरने नुकताच तायक्वांदोमध्ये यल्लो बेल्ट मिळवला आहे. या बेल्ट प्रदान कार्यक्रमाला खान कुटुंब पोहचलं तेव्हाही फोटोग्राफर्सनी त्यांना गाठलं. यावेळी तैमूरनं आपल्या आईवडिलांना खास कराटेची पोज शिकवली. या पोजमधले फोटो व्हायरल होत आहेत.

बिकनीमुळे आमिर खानची लेक आयरा झाली ट्रोल, सोना महापात्रानं घेतली ट्रोलर्सची शाळा


तैमूरच्या शाळेत हा कार्यक्रम होता. तैमूर या कार्यक्रमासाठी खास तायक्वांदोमधील ड्रेसमध्ये आला. कारमधून उतरल्यानंतर त्याला फोटोग्राफर्सनी बोलवलं. त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने एक छान स्माइल देत पोज दिली. तर करिना कपूरने तैमूरला हाताच्या मुठी बनवून पोज शिकवली. करिनाने शिकवल्याप्रमाणे तैमूर पोज देत असतानाच्या फोटोला तैमूरच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. तैमूरही हा क्षण आनंदाने एन्जॉय करताना दिसत आहे.


करिना आणि सैफ तैमूरसोबत अनेक फोटो शेअर करत असतात. त्याला अनेक ठिकाणी सोबत घेऊन जात असतात. मध्यंतरी सोहा अली खानच्या पुस्तक प्रकाशनलाही तैमूरची हजेरी होती. रणबीर आणि आलिया यांच्या लग्नातही तैमूरने लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या तैमूर तायक्वांदोचे शिक्षण घेत असून त्याचेही फोटो करिना शेअर करत असते. तैमूरने यल्लो बेल्ट मिळवल्याचा आनंद सैफ आणि करिनाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘बॉलिवूडला मी परवडूच शकत नाही, मग वेळ का वाया घालवू’

तैमूर

करिना आणि सैफ सध्या तैमूर आणि जहाँगीर या दोन्ही मुलांकडे चांगलं लक्ष देत आहेत. करिना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा या सिनेमात दिसणार आहे. सैफ अली खानचा आदिपुरूष हा सिनेमाही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. विक्रमवेधा या सिनेमातही सैफचा अभिनय पहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here