मुंबई: आजकाल वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज लक्ष वेधून घेत आहेत. वेबसीरिजच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या पसंतीला उतरलेल्या पंचायत या वेबसीरिजचा दुसरा सीझन २० मे ला अॅमेझॉन प्राइमवर झळकणार आहे. पंचायत सिझन टूचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून काही तासात या ट्रेलरला ८ मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. कॉमेडीचा भरपूर तडका असलेल्या या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात नायक अभिषेक त्रिपाठी आणि रिंकी यांच्या प्रेमाचा गुलाबी सिझनही पहायला मिळणार आहे.

पंचायतच्या पहिल्या सिझनमध्ये अभिषेक त्रिपाठीला फुलेरा गावात आल्यानंतर काय काय समस्या येतात त्याची विनोदी ढंगात मांडणी केली होती. शहरात वाढलेल्या अभिषेकचा हा गावातील कामाचा अनुभव तर भन्नाट होताच पण गावातील एकेक नमुन्यांनी धमाल आणली होती. आता दुसऱ्या सिझनमध्ये गावातील पंचायत कारभारातील यंत्रणा दाखवण्याबरोबरच अभिषेक आणि सरपंचाची मुलगी रिंकी यांची लव्हस्टोरीही पहायला मिळणार आहे. कॉमेडीचे पंच आणि निखळ विनोद यामुळे पंचायत सिझन टू प्रेक्षकांवर हास्याचे फवारे उडवणार आहे.

Video : आशुतोषच्या जीवघेण्या अपघातानंतर अरुंधतीला झाली प्रेमाची जाणीव

पंचायत सिझन २

नाइलाजाने गाव पंचायतमध्ये नोकरीसाठी आलेल्या हिरोला रोज नवा प्रश्न भेडसावतो. गावकऱ्यांच्या स्वभावाचे एकेक पैलू समोर येतात. पंचायतमध्ये दिली जाणारी खोटी आश्वासनं, समस्या आणि लोकांना मूर्ख बनवण्याची कारणं या सगळ्याचा समाचार पंचायत सिझन टूमध्ये घेतला आहे. वेबसीरिज प्रदर्शित होण्याआधीच ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

मुस्लिम म्हणून मुन्नवर फारूकीला टार्गेट करत होती पायल रोहतगी?

जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता यांच्या भूमिकांनी ही वेबसीरीज सजली आहे. गावातील चित्रण, गावकऱ्यांची तऱ्हा आणि त्यातून फुलणारा विनोद सोबत एका सामाजिक विषयावर भाष्य अशा कॉमेडी पॅकेजची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here