राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीबाबत बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ‘उत्तर प्रदेश-बिहारसह संपूर्ण देशातील जनता राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र तेथील खासदाराला काय वाटतं, हे त्यांचं त्यांना माहीत,’ असं नांदगावकर म्हणाले.
शिवसेनेवर केला पलटवार
राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं सांगताच युवासेनेचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. तसंच ‘असली आ रहे हैं, नकली से सावधान,’ अशा आशयाचे पोस्टर्स लावत शिवसेनेकडून मनसेला डिवचण्यात आलं. या मुद्द्यावरून बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. ‘असली कोण आणि नकली कोण हे तुम्ही कशाला सांगताय, ते लोकच ठरवतील आणि आम्ही असली आहोत हे सांगण्याची वेळ तुमच्यावर आली आहे,’ असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु; राज ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल अयोध्यावासी म्हणतात…