मुंबई – पॉली मेडिक्युअर लिमिटेड ही पुन्हा वापरात न येणा-या दर्जेदार वैद्यकीय उपकरणांची उत्पादननिर्मिती आणि विपणन व्यवसायातील एक आघाडीची कंपनी आहे.
आजच्या सत्रातील ट्रेंडिंग स्टाॅक; तेजीच्या लाटेवर स्वार फ्लोरिन इंटरनॅशनल
इन्फ्युजन थेरपी, रक्त व्यवस्थापन, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, शस्त्रक्रिया आणि जखमेचे निराकरण, भूल तसेच मूत्रविज्ञान आदी क्षेत्रातील उत्पादनांच्या वापरात डिस्पोजेबल वैद्यकीय उपकरणांचा विविध पोर्टफोलिओत ही कंपनी कार्यरत आहे. कंपनीचे भारत आणि अन्य काही देशांमध्ये विविध प्रकारचे आणि जोखीममुक्त व्यावसायिक मॉडेल आहे. यामध्ये अनेक देशांमध्ये उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे. कंपनीने २७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित एका कार्यक्रमात “इंडिया मेडिकल डिव्हाइस लीडर ऑफ द इयर” हा पुरस्कार जिंकला.

कंपनी एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांकाचा एक भाग आहे. तिने तिच्या गटातील निर्देशांकाच्या जवळपास तीन पट परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ११ मे २०२० रोजीमधील रु. २३३.८० वरून ६ मे २०२२ रोजी रु. ८२८.६० वर पोहोचली. गेल्या दोन वर्षांत त्यात २५४% ची वाढ नोंदली गेली. गेल्या वर्षी या स्टॉकमधील १ लाख रुपयांची गुंतवणूक आज ३.५४ लाख रुपये झाली आहे.

सावरलेल्या शेअर बाजारात या पेनी स्टॉककडून अप्पर सर्किटची नोंद
गेल्या आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल १३.१५% वार्षिक वाढून २३०.२८ कोटी झाला. तथापि, त्याची बॅटमलाईन वार्षिक आधारावर २.३४% ने कमी होऊन ३३.९८ कोटी रुपये झाली.

मूल्यांकनाच्या आघाडीवर ही कंपनी सध्या ३७४.५x च्या संबंधित उद्योगक्षेत्राच्या पीईच्या तुलनेत ५३.२६x च्या TTM PE वर व्यवहार करत आहे. आधीच्या वित्तीय वर्षात कंपनीने १८.७४% चे ROE आणि २१.६२% ROCE वितरित केले आहे.

अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण सखोल माहितीसाठी सबस्क्राईब करा दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल- भारतातील पहिल्या क्रमांकाचे इक्विटी आणि गुंतवणूक मॅगझिन.

मंगळवारी सकाळी ९:३८ वाजता पॉली मेडिक्युअर लिमिटेडचा शेअर ०.९२% च्या वाढीसह ७८१.१५ रुपयांवर व्यवहार करत होते. मुंबई शेअर बाजारात कंपनीने स्टॅकने गेल्या ५२ आठवड्यांचा रु. १,१६३ उच्चांक तर रु. ६८८.५५ हा गेल्या वर्षभरातील नीचांक नोंदविला आहे.

Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here