जळगाव : जिल्ह्यात आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यात शिवसेना व भाजपची युती असल्याचा आरोप करत असतांना दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरात येवून सेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजन व आमदार चंद्रकात पाटील यांच्यात यावेळी बंद दाराआड चर्चाही झाली. आगामी काळात खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांना हाताशी धरुन काही रणनिती आखली जात नाहीये ना? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.
‘राज ठाकरे हिंदू नेता नहीं खलनायक है, कोई दबंग नेता नहीं, चुहा है चुहा’; भाजप खासदार आक्रमक
राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये आलबेल असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे मुक्ताईनगरातील दोन नेते म्हणजेच एकनाथ खडसे आणि सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वितुष्ट हे सर्वश्रूत आहे.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महाविकास आघाडीची सत्ता असतांना बोदवड नगरपंचायत निवडणुकीत सेनेने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप केला होता. खडसेंचे कट्टर वैरी भाजपचे गिरीश महाजन यांनी सेनेला बोदवड नगरपंचायत निवडणुकीत पाठींबा दिल्याने आ. चंद्रकात पाटील व एकनाथ खडसे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून आमदार पाटील व खडसे यांच्यात आजतागायत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी या सुरू आहेत.
युवासेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दोन महिन्यानंतर अखेर आरोपी अटकेत
बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे उदाहरण डोळयासमोर ठेवून एकनाथ खडसेंनी सातत्याने अनेकदाचा ठिकठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये तसेच पत्रकारांशी बोलतांना भाजप सेनेच्या छुप्या युतीचा आरोप केला होता. अशातच सोमवारी मुक्ताईनगरात थेट भाजपचे नेते आ. गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यादरम्यान दोघांमध्ये बंदद्वार चर्चाही झाली.

नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली तसेच भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र, दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूकांमध्ये खडसेंना शह देण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी अचुक टायमिंग साधत सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यात सेना व भाजप हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टिपण्णी व आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते गिरीश महाजन व सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील ही भेट म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात भाजप सेनेच्य युतीचे तर संकेत नाहीहेत ना असेही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

‘तपास यंत्रणांच्या रडारवरील कंपन्यांकडून सोमय्यांची खंडणीखोरी सुरू आहे’ संजय राऊतांचा घणाघाती आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here