मुंबई : मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्याने या दोन्ही नेत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही. ही सुनावणी आता १७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे फरार असणाऱ्या देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. राज यांच्या सूचनेनंतर ४ मे रोजी राज्यभरात मनसे कर्यकर्त्यांना आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यानच शिवाजी पार्क परिसरात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच हे दोघेही आपल्या खासगी वाहनातून भरधाव वेगात निघून गेले. यावेळी गाडीचा धक्का लागून एक महिला पोलीस रस्त्यावर पडली. याप्रकरणी देशपांडे आणि धुरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजप खासदाराचा आक्रमक इशारा, मात्र मनसेची सावध प्रतिक्रिया; काय म्हणाले नांदगावकर?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचं पथक मनसेच्या फरार नेत्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता १७ मे रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून नेमका काय निर्णय दिला जातो, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here