नवी दिल्ली : असानी चक्रीवादळाचा (Cyclone Asani) कहर आंध्र प्रदेशात पाहायला मिळत आहे. ‘असानी’च्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून ओडिशा ते आंध्र प्रदेश सरकार असानीबाबत हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रातील हालचाली तीव्र होत असताना मच्छिमारांना काही दिवस किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ १० मेच्या रात्री म्हणजेच आज रात्री वायव्येकडे सरकेल. यानंतर ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत इंडिगोने विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि जाणारी तब्बल २३ उड्डाणं रद्द केली आहेत. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात ११ मेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर जोरदार वारेही वाहतील, ज्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर असू शकतो.

‘दहशतवादी हल्ल्यातील ग्रेनेडचा वापर’, पंजाबच्या गुप्तचर विभागाच्या स्फोटात धक्कादायक माहिती समोर

पश्चिम बंगालमध्येही या वादळाने कहर केला आहे. यामुळे कोलकात्यात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोलकात्यातील अनेक भागात पाणी साचले असून त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ओडिशात मच्छिमारांनी भरलेल्या ६ बोटी बुडाल्या

असानी चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. आज सकाळी ६० मच्छिमार ओडिशातील ६ बोटींमधून समुद्रातून परतत होते. यादरम्यान मोठा अपघात झाला. उंच लाटांमध्ये अडकलेल्या सर्व बोटी एकामागून एक उलटल्या, त्यानंतर गोंधळ उडाला. मात्र, वेळीच सर्व मच्छिमारांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

योगींची मुंबईत धडक; उत्तर प्रदेशातील लोकांसाठी सुरू करणार सरकारी कार्यालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here