महागाईच्या विषयावर बोलून कुणी त्यात आडवू नये…
चाळीसगाव येथील आयोजित कार्यक्रमानंतर आमदार सदाभाऊ खोत हे पत्रकारांशी बोलत होते. महागाईमुळे शेतकऱ्याचा कसा फायदा होतो, हे सुध्दा यावेळी खोत यांनी पटवून दिले. ‘तेलाचे भाव वाढले तर आपोआपच सोयाबीनचे भाव वाढतात. त्याचा साहजिकच शेतकऱ्याला फायदा होईल. शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव वाढवून मिळत असेल तर महागाईच्या विषयावर बोलून त्यात कुणी त्यात आडवू नये’, असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले. ‘महागाई बोलून ती कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे नेहमी शेतकऱ्यांचं, कष्टकरी माणसाचं वाटोळ होत असल्याचा अजब तर्क सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला’.
२० हजाराचं सोनं ५० हजारावर पोहचलं…
‘२० हजाराचं सोनं ५० हजारावर पोहचलं ती महागाई नाही का?’. ‘दारुवरचा कर कमी करता मग केंद्राने पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला मग राज्याने का कमी केला नाही?’, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. सरकारने येण्यापूर्वी ज्या वल्गना केल्या त्याच पूर्ण करा एवढच आम्ही म्हणत असल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी ठाकरे सरकारवर लगावला.
तेच राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोट का मोडत आहेत…
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर देखील भाष्य करताना ते म्हणाले की, ‘राज ठाकरे हे जेव्हा भाजपच्या विरोधात भूमिका घेवून लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते टाळ्या वाजवायचे. आता तेच राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोट का मोडत आहेत? असा सवाल उपस्थित करत आमदार सदाभाऊ खोत यांनी राज ठाकरेंची एकप्रकारे पाठ थोपटली आहे. आपला तो बाळू व दुसऱ्याचा तो कारट्या या म्हणीचा प्रयत्यही यावेळी आमदार खोत यांनी दिला.