महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे सह १४ महापालिकांच्या अंतिम प्रभागरचना १७ मे रोजी जाहीर होणर आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

 

Election
निवडणूक
मुंबई: राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवणडुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात 17 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्यात 14 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल आगामी काळात वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणी दरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात जाहीर करण्यासं सांगितलं होतं. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं हे परिपत्रक जारी केलं आहे. आजच सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथं देखील स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra state election commission issue circular said municipal corporation ward structure will be declare on 17 may
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here