मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मेचा अल्टिमेटम दिला होता. मनसेच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईत ४ मे रोजी ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी पहाटे ५ वाजता अजाण लाऊड स्पीकरवरुन वाजवली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोन मशिदींवीर कारवाई केली होती. आता मुंबई पोलिसांनी पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये आणखी एका मशिदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी वांद्रे आणि सांताक्रुझ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माझी भूमिका एकला चलो रे असली तरी मी पक्षातच आहे : वसंत मोरे
मुंबईतील आणखी एका मशिदीवर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी आणखी एका मशिदीविरोधात कारवाई सुरु केली आहे. मुंबईतील पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी परिसरातील मशिदीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

यापूर्वी दोन मशिदींवर कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन, लाऊड स्पीकरचा वापर करणाऱ्या धार्मिक स्थळांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केलेली आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी वांद्रे येथील नूरानी मशीद आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यावरुन वाजवण्यात आली होती. ४ मे रोजी मुंबईतील १३५ मशिदींवर पहाटेची अजाण भोंग्यावर वाजवण्यात आली होती. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवर काय कारवाई करणार, असा सवाल केला होता.
संदीप देशपांडेंना पोलिस असे शोधतायेत जसं ते रझाकार आहेत, राज ठाकरे सरकारवर तुटून पडले
पहाटेची अजाण भोंग्याविना करण्याचा २६ मशिदींचा निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेम दिला होता. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी धार्मिक स्थळांना सर्वोच्च न्यायालयाचं पालन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी मुंबईतील मशिदींसोबत चर्चा केल्यानंतर दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या प्रमुखांनी बैठक घेत पहाटेची अजाण भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारनं सहनशीलतेचा अंत पाहू नये, असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here