चंद्रपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर एका बॅगेत जिलेटिनच्या तब्बल ५४ कांढ्या आढळल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. आरोपींचा शोध लोहमार्ग पोलीस घेत आहेत. यावर आमदार तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस विभागावर बोचरी टीका केली. मुनगंटीवार म्हणाले की, ‘जेव्हा पोलीस विभाग सूड घेण्याचा राजकारणातील सक्रीय विभाग होतो. तेव्हा गुन्हेगारांना अश्या कृती करण्यासाठी संधी मिळत असते. नागपूरसारख्या वर्दळ असणाऱ्या शहरात जिलेटिनचा कांढ्या सापडणे ही गंभीर बाब आहे. याची योग्य चौकशी व्हायला हवी. याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत. हे शोधलं पाहीजे’, असं ते म्हणाले.
‘मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्या, मिलिंद नार्वेकरांना धमकी याचा शोध अद्याप लागलेला नाही. अशा वातावरणात पोलीसांचे राजकरण करण्यापेक्षा पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यासाठी योग्य सूचना केल्या तर ते गुन्हेगारांच्या मागे लागतील. नेत्यांच्या मागे लागायला सांगितले तर जिलेटिनचा कांड्या ठेवणारे गुन्हेगार अश्या पध्दतीची कृती करतील’, असा घणाघातही मुनगंटीवारांनी केला.