जालना: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित २९व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय घोगरे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.

दिनांक २८ व २९ मे २०२२ रोजी मंठा (जालना) येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली २९वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात देशभरातून चारशे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.

महापालिकांची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार, निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार?
याआधी सांगली, औरंगाबाद, उदगीर, पुणे, तुळजापूर, सोलापूर, नवी मुंबई, गोंदिया, जव्हार, वणी आणि रत्नागिरी आदी ठिकाणी संमेलन संपन्न झाली आहेत. आज साहित्य संमेलनाच्या नियोजन संदर्भात जालना येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल खंदारे, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष भरत मानकर, प्रदेश संघटक अमोल कुंभार, जिल्हा कुलदीप रूघे, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, सुकाणू समिती सदस्य प्रा.धोंडोपंत मानवतकर, प्रा.सदाशिव कमळकर, प्रा.प्रदिप देशमुख, प्रा.कु.पी.इंगळे, गौतम वाहूळ, अशोक तनपूरे, योगेश बरिदे, डाॅ. बप्पासाहेब म्हस्के, अरविंद देशमुख, प्रा.प्रशांत येलगड, प्रा. भारत खंदारे आदी उपस्थित होते.

आयफोन प्रेमींसाठी गुड न्यूज, आयफोन ११, १२ आणि १३ च्या किंमतीत मोठी कपात, पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here