इस्लामाबाद :पाकिस्तान आणि चीन यांच्यातील तणाव आता समोर येत आहे. पाकिस्तान देखील श्रीलंकेसारखं आर्थिक संकटात आलं आहे. चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तान सरकारनं ३०० अब्ज रुपयांची थकबाकी दिली नाही तर वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. इमरान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानवरील कर्ज वाढला आहे. पाकिस्तानवरील एकूण कर्जापैकी २० टक्के कर्ज चीनचं आहे.

चीनच्या दोन डझनहून अधिक कंपन्या पाकिस्तानमध्ये काम करत आहेत. पाकिस्तान सरकारनं ३०० अब्ज रुपयांची थकबाकी न दिल्यास आम्हाला वीज प्रकल्प बंद करावे लागतील, असं म्हटलं आहे. जोपर्यंत आमची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही वीज प्रकल्प सुरु करणार नाही, असा इशारा वीज कंपन्यांनी दला आहे. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत ३० चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात व्यवसाय सुरु केला आहे.

श्रीलंकेत भयानक स्थिती, रस्त्यावर दिसताच गोळी मारण्याचे आदेश

रेल्वे, ऊर्जा आणि दळवळण क्षेत्रात चीनच्या कंपन्यांनी प्रवेश केला आहे. समोवारी पाकिस्तानचे योजना आणि विकास मंत्री एहसान इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपन्यांनी स्पष्टपणे पाक सरकारला धमकी दिली आहे. याशिवाय वीज कंपन्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांसमोर वीज प्रक्रिया आणि टॅक्स संदर्भातील अडचणी मांडल्या.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वीज पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, कंपन्यांनी थकबाकीच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करत याला नकार दिला. कंपन्यांनी इंधनांच्या वाढत्या कंपन्या, कोळश्याचे वाढलेले दर याचा दाखला देत वीज पुरवठ्यासाठी अ‌ॅडव्हान्स रक्कम देण्याची मागणी केली. कोळसा उत्पादकांनी कोळशाचा साठा कमी असल्याचं सांगत उत्पादन वाढवल्यास, उपलब्ध कोळसा देखील संपून जाईल, असं म्हटलं.
पुतीन रशियात मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा दावा
कराचा दर जास्त असल्यानं कंपन्या नाराज
चीनच्या कंपन्यांनी थकबाकी दिली गेली नसल्याचं सांगितलं आहे. करोना महामारीमुळं आर्थिकदृष्ट्या संकट आलं असून जादा कर असल्यानं नवी संकट आल्याचं वीज कंपन्यांची अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या मत्र्यांनी शाहबाज शरीफ यांची दखल घेतली असून वीज कंपन्यांची थकित रक्कम दिली जाईल, असं म्हटलं.

ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीय; यूपीतल्या महंतांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here