Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला घाबरते, असे त्यांनी म्हटले. मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात राज ठाकरे यांनी नुकतेच जाहीर पत्र लिहून राज्य सरकारला जाहीर इशारा दिला होता. राज ठाकरे यांचे हे पत्र अत्यंत समर्पक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

 

Sharad Pawar Chandrakant patil
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले.

हायलाइट्स:

  • कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असूनही त्यांना ९६ हजार मते मिळाली
  • एकटं लढूनही भाजपला ७८ हजार मते मिळाली
पुणे:शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष भाजपला घाबरत असल्यामुळेच त्यांच्यात एकट्याने लढण्याची हिंमत नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रपणेच लढेल, यादृष्टीने नियोजन करत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले. ते भाजपला इतके घाबरतात की, त्यामुळे एकटे-एकटे लढण्याची हिंमतच नाही. पण ते एक असतानाही त्यांची काय फ्या फ्या उडते, हे आपण कोल्हापूरमध्ये पाहिले आहे, असे पाटील यांनी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP leader Chandrakant Patil takes a dig at Sharad Pawar and Mahavikas Aghadi)
शिवसेना आपल्या जुन्या मूडमध्ये आली आहे, चंद्रकांत पाटीलांची खोचक टीका
यावेळी त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असूनही त्यांना ९६ हजार मते मिळाली. तर एकटं लढूनही भाजपला ७८ हजार मते मिळाली. आणखी ९ हजार मतं तिकडूनची इकडे झाली असती तर निकाल वेगळा लागला असता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी ३२ हजार मतं मिळाली तर भाजपला एकट्याला ७८ हजार मते मिळाली. हाच पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
गिरीश महाजनांनी घेतली शिवसेना आमदाराची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादासंदर्भातही भाष्य केले. मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात राज ठाकरे यांनी नुकतेच जाहीर पत्र लिहून राज्य सरकारला जाहीर इशारा दिला होता. राज ठाकरे यांचे हे पत्र अत्यंत समर्पक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही. महाविकास आघाडीचा व्यवहार आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय, असा आहे. याला अटक कर, त्याला पकड , खोटे पुरावे, खोट्या केसेस केल्या जातात. अगदीच काही नाही तर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा हाताशी धरून घरांना नोटीस दिल्या जातात. या सगळ्याला कोणताही धरबंद उरलेला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sharad pawar and maha vikas aghadi having fear of bjp says chandrakant patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here