ही आग घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्र अग्निसुरक्षा प्रतिबंधक कायदा २००६ नुसार प्रत्येक इमारतीला अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. अचानक आग लागल्यास इमारतीतील अग्निशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणे तसेच अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी सहाय्यक ठरण्यासाठी आग प्रतिबंधक यंत्रणा आवश्यक आहे. जिवेश इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत अग्निशमन दलातर्फे सोसायटीला नोटीस पाठवली जाणार आहे. आगीच्या घटनेची स्थानिक पोलिस व अग्निशमक दलाचे अधिकारी तपास करत असल्याचे दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Home Maharashtra शाहरूख खानच्या बंगल्याजवळील इमारतीच्या आग दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती उघड – shocking information...
शाहरूख खानच्या बंगल्याजवळील इमारतीच्या आग दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती उघड – shocking information revealed after a fire accident in a building near shah rukh khan’s bungalow
मुंबई : वांद्रे पश्चिम, बँडस्टँड येथे सोमवारी आग लागलेल्या जिवेश सोसायटीत आग प्रतिबंधक उपाय कागदावरच असल्याचे आढळून आले आहे. अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता न केल्याबद्दल मुंबई अग्निशमन दल सोसायटीला लवकरच नोटीस पाठवणार आहे. (Mumbai Fire Update)