वजन कमी असल्याने त्याला वेगवेगळे इन्फेक्शन होत होते. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. अशा परिस्थितीत बाळावर उपचार करून त्याचे प्राण वाचविण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. डॉक्टरांनी बालकांवर उपचार सुरू करून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने ऑक्सीजन देण्यात आला. इतर आजाराचे इन्फेक्शन होत असल्याने वेगवेगळे इंजेक्शन देण्यात आले.
वजन कमी असल्यामुळे बाळाला आईचे दूध घेता येत नव्हते. त्यामुळे कांगारू मदर केअर देऊन ७० दिवस उपचार केल्यानंतर बालकाची प्रकृती ठणठणीत झाली आहे. बालकाचे वजन ८०० ग्रामवरून दीड किलोपर्यंत पोहोचले आहे. बाळ जगण्याची खात्री पटल्यानंतर बाळासह मातेला रुग्णालयातून सुट्टी दण्यात अली आहे. बाळावर एसएनसीयु विभाग प्रमुख डॉक्टर विशाल पवार, बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप मोरे यांनी यशस्वी उपचार केले. बाळाचा दुसरा जन्म झाला असल्याचे मत आई – वडिलांनी व्यक्त केला आहे.
दोन बालकांवर उपचार सुरू
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयु विभागामध्ये दोन कमी वजनाच्या बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये एका बालकाचे वजन ८६० ग्राम आहे. दुसऱ्या बालकाचे वजन ८८० ग्राम इतके आहे. त्यांच्यावर मागील ५६ दिवसांपासून उपचार केले जात आहेत, अशी माहिती डॉक्टर विशाल कदम यांनी दिली आहे.
मित्रांवर काळाचा घाला, कार्यक्रमावरून घरी परतत असताना अपघात, चौघांचा मृत्यू