मुंबई : कलाकार हे त्यांच्या सिनेमामुळे लोकप्रिय होत असतात हे खरं आहेच पण त्याबरोबरच ते व्यक्तिगत आयुष्यात कसे वागतात, मदतीसाठी धावून येतात यावरही त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत असतो. हे अभिनेता सोनू सूदने दाखवून दिलं आहे. करोनाकाळात सोनू सूद असंख्य गरजूंसाठी देवदूत बनून मदतीला धावला होता. गरीब लोकांसाठी त्याने निधी उभा केला. त्याच्या फाउंडेशनतर्फे आजवर सोनू अनेकांना मदतीचा हात दिला आहे. आता तर एक पाऊल पुढे टाकत सोनू त्याच्या स्टारडमसाठी मिळणारी रक्कम गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी उभी करणार आहे. त्यासाठी सोनूने एक अफलातून शक्कल लढवली आहे.

सोनूने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. गरजूंची मदत करण्यासाठी सोनू काहीही करायला तयार असतो. त्याला जेव्हा जाणवलं की अनेक गरीब लोकांना पैशाअभावी चांगले उपचार मिळत नाहीत. त्यातूनच त्याला ही कल्पना सुचली.

ट्विटरवर सुनंदा पुष्कर यांचं नाव घेतल्याने भडकले शशी थरुर

सोनू सूद

सोनूला एका हॉस्पिटलच्या प्रमोशनची ऑफर आली होती. या ऑफरच्या बदल्यात त्याला तगडं मानधनही मिळणार होतं. पण थेट पैसे न घेता सोनूने प्रमोशन करण्याच्या मोबदल्यात ५० गरजू रूग्णांवर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची अट घातली. सोनूची ही ऑफर हॉस्पिटलने मान्य करत सोनूला १२ कोटी रूपयांचा फंड दिला आहे. या फंडातून सोनूच्या मदतीने गरजू रुग्णांच्या लीव्हर ट्रान्सप्लांटचा प्रश्न सुटणार आहे.

रणबीर कपूरला पाहताच I Love You म्हणू लागल्या चाहत्या, अभिनेत्याची प्रतिक्रिया

सोनूने आजपर्यंत जाहिरात, प्रमोशन या माध्यमातून जी कमाई केली आहे ती सगळी मदतकार्यासाठीच वापरली आहे. जाहिरातीची ऑफर आली की सोनू त्यांना मानधनाचे पैसे थेट गरजूंना देण्याची किंवा त्याच्या फाउंडेशन निधीमध्ये देण्याची विनंती करतो. या माध्यमातून सोनूने अनेकांना मदत केली आहे. सोनूने अजून एक आवाहन केलं आहे की ज्या हॉस्पिटलना माझ्यासोबत काम करायचं असेल त्यांनी माझ्या मानधनाऐवजी गरजूंच्या उपचाराची जबाबदारी घ्यावी. सध्या एका हॉस्पिटलने दोन लीव्हर ड्रान्सप्लांटचं काम सुरू केलं आहे. जेव्हा खूप अडलेले लोक सोनूकडे मदतीसाठी येतात तेव्हा सोनू अशा कल्पना शोधून काढतो.


करोना काळात सोनूने अनेक कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासाची सोय केली होती. रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिलं होतं. गेल्या तीन वर्षात सोनूने गोरगरीबांसाठी जे काम केलं आहे त्यामुळेच तो रिअल हिरो बनला आहे. लवकरच सोनू पृथ्वीराज या सिनेमात दिसणार आहे. फतेह या सिनेमातही त्याची वर्णी लागली आहे. सध्या सोनू रोडीज या रिअॅलिटी शोला होस्ट करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here