म. टा. वृत्तसेवा, संगमनेरः करोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर परिसरात घडली.

बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०) सागर जयमोहन जनवेजा (वय ३८), इंद्रजीतसिंग सुभाष बत्रा (वय ३६), शिवकुमार मनोजकुमार कालडा (वय २७) सौरभ अरविंद पापडेजा (वय २८) अशी यामधील जखमींची नावे आहेत.
संगमनेरमधील पंजाबी बांधवांच्यावतीने बसस्थानकासमोरील गुरूद्वारा येथे गरजुंसाठी जेवण बनविण्यात येते. त्यानंतर जेवणाची पाकिटे बनवून ती ग्रामीण भागातील गरजुंना पोहोचवली जातात. कौठे कमळेश्वर व निळवंडे परिसरातील गरजुंना जेवणाची पाकिटे देण्यासाठी सहा जण हे कारने निघाले होते. कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान या वाहनाचे मागील दोन्ही टायर फुॉटल्याने अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यातील जेवणाची पाकिटे रस्त्यावर सर्वत्र विखुरली गेली होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक जखमींना मदत उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here