मुंबई : या वर्षी फेब्रुवारीत सुरांची मल्लिका लता मंगेशकर हे जर सोडून गेल्या. त्यानंतर १० मे रोजी आणखी एक सूर हरपला. पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं. त्यांनी अल्बमसोबत अनेक सिनेमांनाही संगीत दिलं. १९९१मध्ये आलेल्या लम्हे सिनेमातलं मोरनी बागा मा हे गाणं खूप गाजलं होतं. त्यात दिवंगत श्रीदेवी होत्या.

पंडित शिवकुमार यांचा व्हिडिओ

१० मे २०२२ रोजी सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनानं संगीतातलं एक रत्न काळाआड गेलं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी लता मंगेशकर यांच्यासह अनेक स्टार्ससोबत काम केलं. लम्हे सिनेमातलं मोरनी बागा मां गाणं लता दीदींनी गायलं होतं. त्याच्याच रिहर्सलचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लता मंगेशकर यांच्याबरोबर गुणगुणताना दिसले पंडितजी

लता मंगेशकर आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरिप्रसाद आणि शिवकुमार यांनी एकत्र अनेक ट्रॅक बनवले. त्यांना शिव-हरीची जोडी म्हटलं जायचं. या व्हिडिओत लता दीदी आणि शिवकुमार एक रेकार्डिंग स्टुडिओत सूर आणि गाण्याच्या ओळींचा सराव करताना दिसत आहेत.

हॉस्पिटलच्या प्रमोशनच्या मोबदल्यात सोनू सूदने मागितले ५० लीव्हर ट्रान्सप्लांट

शिवकुमार शर्मांचं अमूल्य योगदान

शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. १९८५ मध्ये पंजित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.

शिवकुमार शर्मा

संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय सिनेसंगीतातही फार मोठी कामगिरी बजावली आहे. या जोडीने अनेक सिनेमांना संगीतबध्द केलं असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या सिनेमांनाही संगीत दिलं.

Photo- प्राजक्ता माळीकडून फेसबुक पोस्टमध्ये झाली गंभीर चूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here