नवी मुंबई : एका महिलेकडून करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे गोत्यात आलेले भाजपचे नेते गणेश नाईक अखेर अज्ञातवासातून बाहेर पडले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमच नाईक जाहीररीत्या बाहेर पडले असून त्यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बलात्कार, जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यानंतर गणेश नाईक हे अज्ञातस्थळी होते. पण आता समोर येत माझ्यावर गुन्हे दाखल झाले हा एक षडयंत्र आहे. काही जणांना राजकारणात योग्य ते स्थान मिळालं नसल्याने हे षडयंत्र केलं जात आहे. विरोधी राजकीय पक्षांनी हे षडयंत्र केलं असल्याची टीका गणेश नाईक यांनी केली आहे.

राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
ते पुढे म्हणाले की, ‘न्यायालयाने मला सूट दिली आहे पण काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मी माझ्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांवर सविस्तर बोलणार आहे’ गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमच गणेश नाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक हे प्रथमच मनपा आयुक्तांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Weather Alert : असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका, मुंबईसह ५ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here