बच्चू कडूंचा दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर…
पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून न्यायालयीन लढा देत आहे. या प्रकरणी बच्चू कडूंनी पहिल्यांदा २८ एप्रिल रोजी अकोला जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला. आणि ९ मेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा कडूंचा ९ मेरोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला गेला. आज बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली आणि निर्णय झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. बच्चू कडू यांची न्यायालयात बाजू ऍड. बी.के. गांधी यांनी बाजू मांडली.
बच्चू कडूंविरुद्ध पुरावेच नाही, ‘एसपीं’चा अहवाल…
ग्रामीण भागातील रस्ते, पुलाच्या कामात अनियमिता झाल्याप्रकरणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि चौकशीसाठी परवानगी मिळावी, याकरीता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांना सविस्तर निवेदन आणि काही दस्तावेजही सादर केले. याची दखल घेत राज्यपालांनी, याप्रकरणी योग्य कारवाई करा, असे निर्देश अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले होते.
दरम्यान, या संदर्भात चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. मात्र, ‘या प्रकरणात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याएवढे पुरावे नाहीत,’ असा अहवाल पोलिस अधीक्षकांनी राजभवनाला सादर केला होता, एकूणच या प्रकरणात ‘कडू’ यांना राज्यपालांसमोर ‘क्लिनचीट’ देण्याचा प्रयत्न झाला होता, हे सदर अहवालातून स्पष्ट झालं होतं.