राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल. बाळा नांदगावकरला धमकी आली, ते ठीक आहे. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यामुळे आता मनसे पुढे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंना धमकीचं पत्र
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना निनावी पत्राच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असे या पत्रात म्हटले आहे.
राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला जाहीर पत्र लिहून या कारवाईवर ताशेरे ओढले होते. सरकारने मनसैनिकांवर केलेली कारवाई अत्याचारी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला येत नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते. गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.
null