नवी दिल्ली : भारतातील सगळ्यात मोठे श्रीमंत गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाहीतर ते जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaire Index), अदानी यांची एकूण संपत्ती ६.४२ अब्ज डॉलरने म्हणजेच ४९,५९८ कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

यामुळे ते श्रीमंतांच्या यादीतून आता सहाव्या स्थानावर घसरले आहेत. अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett)यांनी त्यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती आता १०८ अब्ज डॉलर झाली आहे. एका वर्षी त्यांची एकूण संपत्ती ३१.९ अब्ज डॉलरवर पोहोचली होती आणि ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. पण, त्यानंतर त्याची एकूण संपत्ती घसरली आणि ते श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरले. ११९ अब्ज संपत्तीसह गेट्स या यादीत चौथ्या आणि बफे ११३ अब्ज संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

Gold Price Today : तीन महिन्यांत सोनं सगळ्यात स्वस्त, चांदीही घसरली; वाचा नवे दर
कोण आहे सगळ्यात श्रीमंत?

टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे(SpaceX) सीईओ एलोन मस्क (Elon Musk) जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३२ अब्ज डॉलर आहे. यानंतर Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १३३ अब्ज डॉलर आहे. फ्रेंच उद्योगपती आणि LVMH Moët Hennessy चे बर्नार्ड अर्नॉल्ट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १२० अब्ज डॉलर इतकी आहे. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ९०.७ अब्ज संपत्तीसह या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती १.४६ अब्जने कमी झाली.

शेअरमधील मूल्यइंधनरूपी स्टॉक, अर्थात गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here