तब्बल ७२ लाख रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिन्यांवर डल्ला…
याबाबत व्यापारी प्रकाश जोरावरमल चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे जुन्या आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस नावाचे दुकान आहे. १ ते १० एप्रिल दरम्यान दुकानात सोने विभागाशी स्टॉकचे देखरेख करणारे शांतीलाल हमीराम कलबी (रा. मंडार ता. रेवदर जि. सिरोही, राजस्थान) व त्याचा साथीदार किशोर नटवरलाल कोली (रा. पिथापुरा त रेवदर जि. सिरोही, राजस्थान) यांनी मालकाचा विश्वासघात केला. त्यांनी दिलेल्या जबाबदारीचा गैरवापर करून दुकानातील तब्बल ७२ लाख रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने परस्पर काढून घेवून अपहार केला. ९ एप्रिल रोजी हा प्रकार व्यापारी प्रकाश चौधरी व त्यांचा भाऊ सरदारमल चौधरी यांच्या लक्षात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाची आत्महत्या…
सोने-चांदीच्या स्टॉकमध्ये अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी चौधरी बंधूंना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी दुकानातील चांदी खात्याचा हिशोब व व्यवहार बघणारा हितेश दिनेशकुमार जोशी व सोन्याचा स्टॉक बघणारा शांतीलाल कलबी या दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी परस्पर दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच यात किशोर कोली याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी सात दिवसात तुमचा संपूर्ण माल परत आणून देतो, असे सांगितले. मात्र, १३ एप्रिल रोजी हितेश जोशी याने आत्महत्या केली. तर शांतीलाल कलबी हा तेव्हा पासून फरार झाला आहे.