संजीव रंजन प्रसाद हे भारत सरकारच्या भेल या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होते ते आता निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते त्यांच्या पत्नी साधना प्रसाद यांच्यासह एका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. संजीव प्रसाद यांचे वकील अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे. संजीव प्रसाद यांचा मुलगा श्रेय सागर याचा विवाह २०१६ मध्ये नोएडातील शुभांगी सिन्हा हिच्याशी झाला होता. श्रेय सागर हे पायलट आहेत, तर त्याची पत्नी नोएडामध्ये नोकरी करते.
संजीव रंजन प्रसाद यांनी माझा सर्व पैसा मुलगा श्रेयवर खर्च केला आहे. त्याला अमेरिकेत प्रशिक्षण दिलं आहे. आता आमाझ्याकडे पैसे नाहीत. मी घर बांधण्यासाठी बँकेकडून पैसे घेतले होते. आता आम्ही आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर त्रस्त आहोत, असं प्रसाद म्हणाले. श्रेय प्रसाद आणि शुभांगी सिन्हा यांच्या लग्नाला आता ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, ते दोघेही मुल जन्माला घालण्याबाबत निर्णय घेत नाहीत, यामुळं आम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे, असं संजीव प्रसाद म्हणाले.
संजीव प्रसाद यांनी हरिद्वार जिल्हा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आम्ही आमच्या मुलावर आणि त्याच्या शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावलं. मात्र, या वयात आ्हाला एकटं राहवं लागत आहे. ही त्रासदायक गोष्ट आहे. या वेळी श्रेय कुमार आणि शुभांगी सिन्हा यांनी आम्हाला नातू द्यावा अन्यथा दोघांना अडीच अडीच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे. संजीव प्रसाद यांचे वकील ए.के. श्रीवास्तव यांनी हे आजच्या समाजाचं वास्तव आहे. आपण आपल्या मुलांवर खर्च करतो, नोकरी बवण्यास पात्र बनवतो. मुलांची देखील आपल्या पालकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे, असं श्रीवास्तव म्हणाले. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.
धर्म आणि हिंदुत्व शिकवणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी असं उत्तर दिलं