कोल्हापूर : येथील आजऱ्याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडली आहे. विजेच्या खांब्याखाली असणारी हि कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून हि कवटी ताब्यात घेतली आहे.

कर्णधारपद गेल्यावर रवींद्र जडेजाला अजून एक मोठा धक्का, आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ
सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या खांब्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान, रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. कवठी कशाची असावी, येथे कोणी आणून टाकली, भोंदूगिरी करण्यासाठी आणली असावी का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

विराट कोहलीची मोठी घोषणा, आरसीबीच्या संघात बदल; धडाकेबाज खेळाडूची होणार एंट्री…
आजरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या कवटीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असून या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here