आयएएस पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांना देखील ईडीनं अटक केली आहे. अभिषेक यांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पूजा सिंघल आणि अभिषेक झा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. ईडीनं अभिषेक झा यांच्या पल्स हॉस्पिटलवर देखील छापे टाकले होते. ईडीनं पल्स हॉस्पिटलमध्ये आलेली गुंतवणूक कुठून आली, असा प्रश्न विचारल होता. ईडीनं हॉस्पिटलमध्ये १२३ कोटींची गुंतवणूक झाल्याचं दिसत असून तुम्ही २३ कोटीचा उल्लेख कसा करता, असा सवाल अभिषेक झा यांना केला आहे.
२० ठिकाणी छापे १९.३९ कोटी जप्त
ईडीनं पूजा सिंघल यांच्याशी संबंधित सीएच्या घरातून १९.३१ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीनं मुंबई, दिल्ली, जयपूर आणि रांचीमध्ये छापे टाकले. ईडीला जप्त केलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यासाठी बस बोलवाली लागली होती होती.
ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली होती. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले होते. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले होते.
पूजा सिंघल या झारखंडमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या. पूजा सिंघल यांच्यावर चतरा, खुंटी आणि पलामू जिल्ह्यात उपायुक्त असताना आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले होते. ईडीनं पूजा सिंघल यांच्या विरोधात न्यायालयात मनरेगा घोटाळा प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
भोंगा आंदोलन प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनाही अखेर अटक