मुंबई : नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार खूप मेहनत घेत असतात हे तर आपण नेहमीच पाहतो. सिनेमाच्या शूटिंगपेक्षाही कलाकार मंडळी प्रमोशनसाठी अनेक फंडे वापरतात. रणवीर सिंगने त्याच्या जयेशभाई जोरदारसाठी अतरंगी कपडे घालून लक्ष वेधून घेतलं होतं. त्या व्हायरल पोस्टचा धुरळा अजून खाली बसायचा आहे तोपर्यंत कंगना रणौतने तिच्या धाकड सिनेमाचं सगळीकडे कौतुक होत असल्याचा दावा केला आहे.

भाईजान सलमान खान याची बहिण अर्पिता खान हिने दिलेल्या ईद पार्टीतही कंगनाने धाकडची हवा करण्याची संधी सोडली नाही. धाकडच्या ट्रेलरचं सगळीजण कौतुक करत असल्याचं सांगत अप्रत्यक्षपण तिने तिच्या आगामी सिनेमाचं या सेलिब्रिटी पार्टीत प्रमोशन केलं.

अदा शर्मानं बप्पीदांची दागिन्यांवरून केलेली मस्करी पडली महाग

कंगना सलमान

बॉलिवूड सेलिब्रिटींना दरवर्षी सलमान खानच्या घरी होणाऱ्या जंगी ईद पार्टीचे वेध लागलेले असतात. प्रत्येक वर्षी ईदच्या मुहुर्तावर सलमान त्याचा नवा सिनेमा रिलीज करतो आणि त्यानंतर सिनेमासोबतच ईदची पार्टी ठेवतो. यंदा सलमानचा कोणताच सिनेमा ईदला प्रदर्शित झाला नाही. पण ईद आणि पार्टी हा सलमानचा ट्रेंड थांबू नये यासाठी यंदा सलमानची बहीण अर्पिता खान हिने ईदची पार्टी ठेवली. तिच्या नव्या आलिशान घरात झालेल्या या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

कंगना रणौत

सलमानच्या वतीने अर्पिताने दिलेल्या या पार्टीत बॉलिवूडची बिनधास्त क्वीन कंगना रणौतही आली होती. कुठे, काय आणि कधी बोलायचं यात कंगना हुशारच आहे. जवळपास सगळं बॉलिवूड हजर असलेल्या ईद पार्टीत कंगनाने तिच्या आगामी धाकड सिनेमाची हवा करायला सुरूवात केली. ती म्हणाली, धाकडचा ट्रेलर सगळ्यांना इतका आवडलाय की प्रत्येकाच्या तोंडी याच सिनेमाचं कौतुक आहे. तसं मी काही माझ्या सिनेमाचं कौतुक करत नाही, पण लोकांकडूनच या सिनेमाच्या ट्रेलरला खूप हिटस मिळताहेत. सगळेच या ट्रेलरने इतके प्रभावित झालेत की आता सिक्रेट कशाला ठेवायचं.

उर्फी जावेद मित्रांबरोबर बेधुंद, Video Viral, म्हणाली मी नशेत होते

लॉक अप या शोची होस्ट म्हणून गेल्या काही दिवसांपासून कंगना लाइमलाइटमध्ये आहे. यापूर्वी अनेकही वादग्रस्त विधानं करून कंगना नेहमी चर्चेत असते. सतत काहीतरी वाद ओढवून घेण्यातही कंगनाचं नाव आघाडीवर असतं. सोशल मीडियावरही कंगना सक्रिय आहे.२० मेला तिचा धाकड हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना एका मारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. मानवी तस्करी करणाऱ्या माफियाच्या रूपात कंगना दिसणार आहे. अर्जुन रामपाल याचीही या सिनेमात खास भूमिका आहे. याच दिवशी भूल भुलैया टू हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने या दोन्ही सिनेमांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here