परभणीत वाळू तस्करांचे दाबे दणाणले आहे. पोलिसांच्या पथकाने नदी पात्रात मोठी कारवाई करून ९४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात ३५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

परभणी : रेती माफियांची धाबे दणाणले, ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची धडक कारवाई
Parbhani News

हायलाइट्स:

  • परभणीत रेती माफियांचे दाबे दणाणले
  • पोलिसांची गोदावरी पात्रात मोठी कारवाई
  • तब्बल ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी : पोलिसाच्या पथकाने गोदावरी नदी पात्रात मोठी कारवाई करून ९४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा गोदावरी नदी पात्रात करण्यात आली आहे. याप्रकरणी ३५ आरोपींविरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी पोलीस पथकासह केलेल्या या कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील रेती माफियांची धाबे दणाणले आहेत.

सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्यातील रेती बोटीने काढून ती रेती पोकलँडच्या सहाय्याने टिप्परमध्ये भरून विक्री व साठा करण्याकरीता घेवून जात असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री श्रनिक लोढा यांनी पथकासह त्याठिकाणी छापा मारला. आरोपी हे कोणताही परवाना नसताना स्वत:च्या आर्थीक फायद्याकरीता शासनाचा महसूल कर बुडवून बेकायदेशीररित्या रेतीचा साठा करून नदीच्या नदीच्या नैसर्गीक प्रवाहास बाधा होईल अशा प्रकारचे उत्खनन तसेच नदीच्या निचरा प्रक्रीयेस क्षती पोहचेल अशा प्रकारचे वर्तन करत असताना मिळून आले. त्याठिकाणी चालक लोकांना विचारणा केली असता त्यांनी हे काम संजय मुंढे यांच्या सांगण्यावरून केला असल्याचे कबूल केले आहे.
आता माफी जरी मागितली तरी ५ तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही, बृजभूषण सिंग यांनी दंड थोपटले
या कारवाईत २ बोटी, ४ पोकलँड व १२ टिप्पर ट्रक व दोन टिप्पर ट्रक भरून रेती असे मिळून तब्बल ९४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ३५ आरोपींविरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

RR vs DC Live Score : दिल्ली आणि राजस्थानच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : parbhani sand smuggler action
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here