पी.एन. ओक कोण होते?
पी. एन. ओक यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम नागेश ओक हे होतं. ओक यांनी ‘ताजमहल नव्हे तेजोमहाल’ ‘कुतुबमिनार नव्हे विष्णुस्तंभ’, असे अनेक वास्तूंबाबत नवे सिद्धांत मांडले. यानंतर त्यांना टोकाजी टीका देखील सहन करावी लागली होती. पी.एन. ओक यांचा जन्म १९१७ ला इंदूरमध्ये झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेऊन काही काळ वकिली देखीलकेली होती. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी ही वैदिक हिंदुत्वाचीच रूपे आहेत, असं त्याचं मत होतं. ओक यांनी भारतीय इतिहासाचे पूनर्लेखनचा ध्यास घेतला होता.
पी.एन. ओक यांनी वकिली सुरु केल्यानंतर ते ते ब्रिटीश आमीर्त दाखल झाले. पुढील काळात नेताजी सुभाषचंद बोस यांनी देशभरातील तरुणांना स्वातंत्र्ययुद्धासाठी दिलेली हाक ऐकून ओक आझाद हिंद सेनेत दाखल झाले. सुभाषचंद बोसांच्या सोबत त्यांनी काम केलं होतं. युद्धसमाप्तीनंतर ते सिंगापूर ते कोलकाता हा प्रवास पायी करुन आले होते. या काळातच ब्रिटिशांनी लिहिलेला भारतीय इतिहास चुकीचा असून त्याचे पुनलेर्खन केले पाहिजे, या ध्येयानं त्यांनी कामाला सुरुवात केली होती.
ताजमहालाचा सिद्धांत गाजला
पी.एन. ओक यांनी दिल्लीत स्थायिक होऊन काही वर्षे पत्रकारिता केली. पुढे ओक यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर रिरायटिंग हिस्टरी’ या संस्थेची स्थापना केली. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी त्यांना पटलेला इतिहास जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले. पी.एन ओक यांचा ताजमहालविषयीचा सिद्धांत सर्वाधिक गाजला. बहुतांश मुस्लिम मशिदी आणि वास्तूंच्या ठिकाणी पूर्वी मंदिरे होती, असा ओक यांचा ठाम विश्वास होता. ताजमहाल हेही पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही पूर्ण ताजमहाल आपल्याला दाखवला जात नाही, याचे कारण त्याठिकाणी दडलेले हिंदू मंदिराचे पुरावे, हेच आहे, असे ते मानत. म्हणूनच हे सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सर्व इस्लामिक आणि ख्रिस्ती वास्तूंचे उत्खनन करण्याची परवानगी मिळाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कोर्टाची दारेही ठोठावली. हा नवा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.
अकबर हाही खरा सहिष्णू राजा नव्हता तर त्याच्या काळातही अनेक अन्याय अत्याचार झाले, असा त्यांचा दावा होता. यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीकाही झाली. इतिहासलेखनाची नवी भारतीय पद्धतही ओक यांनी प्रथम मांडली. त्यावर त्या काळात ताशेरे ओढले गेले; परंतु नंतर काही इतिहासकारांनी तीच पद्धत चोखाळली. इतिहासाबरोबरच इंग्रजी भाषेची व्युत्पत्तीही संस्कृतमध्येच आहे, असे त्यांचे मानणे होते. ते सिद्ध करण्यासाठी ते हिरीरीने वादविवाद करत असत. २००७ मध्ये पी.एन. ओक यांचं निधन झालं होतं.
‘चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांशी गद्दारी केली, विश्वासघात केला’; खडसेंचे खडेबोल