म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी आत्तापर्यंत १९७ कोटी रुपये जमा केले आहेत. नागरिकांनी या कामी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीत वाढता आर्थिक ओघ असून, आत्तापर्यंत त्यात सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही मदत करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

या निधीत ८३ दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत ग्राफाइट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लुराइन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. या शिवाय लहान मुलांसह अनेक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावला आहे.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-१९’ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० असून, अन्य तपशील – स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३, शाखा कोड ००३००, आयएफएससी कोड – एसबीआयएन ००००३०० असा आहे. या देणग्यांना प्राप्तिकर अधिनियम १९६१च्या ८० (जी)नुसार करकपातीतून १०० टक्के सवलत देण्यात येते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here