पुणे : राज्यसभा खासदार म्हणून मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या आगामी राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत. संभाजीराजे यांना ६ वर्षांपूर्वी भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. तेव्हापासून ते या पक्षाचे सहयोगी सदस्य होते. मात्र पक्षाच्या व्यासपीठापासून ते कायम दूर राहिले. आता खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नुकतीच त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी मिळण्यात फडणवीस यांचंही योगदान असल्याने आपण त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं असलं तरी विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे.

‘या’ दोन कारणांमुळे अंतराळवीर न होता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला: आदित्य ठाकरे
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांबरोबर चर्चा करून संभाजीराजांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, याबाबत ट्विस्ट निर्माण झाला आहे.

संभाजीराजे राज्यसभेची सहावी जागा लढवणार?

महाविकास आघाडीच्या वतीने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवणे शक्य झाले नाही तर ते राज्यातून ज्या सहा जागा राज्यसभेवर पाठवले जाणार आहेत त्यातील सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने एकत्रित त्यांना मदत केली तर ते या जागेवर विजयी होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here