बीड : राज्यात अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. अशात बीडच्या धामणगाव घाटात आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये कारचा अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गाडीमध्ये ५ जण होते. ते पुण्याहून बीडकडे येत असताना धामणगाव घाटात कारचा अपघात झाला. कार थेट रस्त्याच्या कडेला धडकल्याने यामध्ये चार जणांना जागीच आपले प्राण गमवावे लागले.

भाजप की महाविकास आघाडी? संभाजीराजे पुण्यात करणार नव्या राजकीय वाटचालीची घोषणा
खरंतर, टेकवाणी एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब आहे. या अपघातामध्ये टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून ४ मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, घाटात अपघात झाल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

हेरवाडनंतर आता ‘माणगाव’ ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल; विधवा प्रथेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here