नवी दिल्ली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. ‘हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडून सतत बसणाऱ्या फटक्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही गालांवर सूज आली आहे,’ अशा शब्दांत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya On Uddhav Thackeray)

‘उद्धव ठाकरेंकडून प्रशासनाचा माफियासारखा वापर केला जात आहे. आमदार आणि खासदाराला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली जात आहे. या नेत्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. या माफियागिरीची माहिती काल मी केंद्रीय गृहराज्यसचिवांना भेटून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचा शेवट करूनच आम्ही शांत बसू,’ असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

जगाची डोकेदुखी वाढणार; ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात करोनाचा विस्फोट

मुंबई पोलीस आयुक्तही सोमय्यांच्या टार्गेटवर

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पारदर्शकपणे काम करत नसल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुंबईचे माफिया पोलीस आयुक्त कुठे आहेत? ते राणा दाम्पत्याला स्पष्टीकरण मागत होते. आता त्यांनी सुप्रीम कोर्टालाच स्पष्टीकरण मागावं, कारण त्यांच्या राजद्रोहाच्या कलमावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या माफियागिरीचाही आम्ही अंत करू,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here