देशभरातील लॉकडाउच्या आजच्या २० व्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये करोनाची स्थिती काय आहे हे, या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. देशभरात आतापर्यंत ८,३५६ इतक्या लोकांना करोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्र राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १९८२ इतकी झाली आहे. करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाउनची मर्यादा वाढवून ती ३० एप्रिलपर्यंत नेली आहे.

Live अपडेट्स…

>> उत्तर प्रदेशातील इटावा येथे पहिला करोनाचा रुग्ण आढळला. जसवंतनगरच्या नगला भगत परिसरात आढळला रुग्ण. संपूर्ण गावाला केले सील.

>> दिल्लीमध्ये आतापर्यंत ४३ हॉटस्पॉट सील करण्यात आली आहे.

>> देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८, ३५६ वर पोहोचली असून आतापर्यंत २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

>> महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात आतापर्यंत १९८२ जणांना करोनाची लागण.

>> नमस्कार. मटा ऑनलाइनच्या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊ या आज देशातील विविध राज्यांमधील करोनाची स्थिती काय आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here