उस्मानाबाद : संभाजीराजे छत्रपती यांचा ( sambhaji raje chhatrapati ) तुळजापूर मंदिर प्रशासनाने (tuljapur band ) केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच मंदिर संस्थानचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, मंदिर व्यवस्थापक तहसिलदार योगिता कोल्हे यांना निलंबित करा, या मागणीसाठी आज तुळजापूर शहरात बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून शहर शंभर टक्के बंद आहे. या बंदमधून मंदिर संस्थानचा निषेध करण्यात आला आहे. संबधित अधिकाऱ्यांना निलंबित न केल्यास हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात उभारू, असा इशाराही देण्यात आला आहे.

संभाजीराजे छत्रपती हे सोमवारी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांना रोखले. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. संभाजीराजे छत्रपतींच्या अवमानामुळे तुळजापूरकर संतप्त झाले आहेत. यामुळेच आज शहरवासियांनी तुळजापूर बंद पुकारला आहे.

पुजाऱ्यांकडून भक्तांसाठी व्यवस्था

तुळजापूर शहरात आज बंद असल्यामुळे येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणुन पुजारी वर्गाकडून मंदिर परिसरात नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तसेच शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. भक्तांची देवी दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून देवीच्या मंदिरात जाण्याची व्यवस्थाही करण्यात आली.

tuljapur band

तुळजापूरमध्ये कडकडीत बंद

संभाजीराजे छत्रपतींना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले; मंदिर संस्थानची दिलगिरी

काय आहे प्रकरण?

संभाजीराजे छत्रपती हे सोमवारी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. नियम सांगत व्यवस्थापनाने संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखले. यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजीराजे छत्रपतींना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले; मंदिर संस्थानची दिलगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here