मुंबई : राज्यात अनेक मुद्द्यांवरून सध्या राजकीय खडाजंगी सुरू आहे. अशात शिवसेना आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वारंवार पाहायला मिळतात. यावरून मनसे नेते योगेश चिले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘संजय राऊत हा चिरकूट माणूस आहे. त्यांना मुंगीही धमकी देणार नाही’ अशा शब्दात योगेश चिले यांनी राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
योगेश चिले यांनी ट्वीट करत राऊतांवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘संजय राऊत हा “चिरकूट” माणुस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही… कोणी धमकी दयावी एवढही त्यांच कर्तृत्व नाही’ दरम्यान, योगेश चिले यांच्या या टीकेमुळे शिवसेना आक्रमक प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे राजकीय पटलावर पुन्हा काय वाद सुरू होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Photos : मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, चिमुकलीच्या पराक्रमाने सगळेच धास्तावले