पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदारकी संपल्यानंतर संभाजीराजे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘स्वराज्य’ ही संघटना स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

जुलै महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर मी दावा सांगत आहे. या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. मे महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

माझी संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगं समजू नये : संभाजीराजे

संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…

– ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करणार असल्याची संभाजीराजेंकडून घोषणा, ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी वागवं समजू नये, त्यासाठी माझी तयारी

– मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे – संभाजीराजे

– मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, तुम्ही मोठं मन दाखवा आणि मला समर्थन द्या. मी तुम्हाला भेटायला येणार आहे.

– सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत मला राज्यसभेवर पाठवावं, मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझा कार्यकाळ समाज हितासाठी

– खासदार झाल्यापासून अनेक कामं केली, पण काही कामं सांगतो. माझा कार्यकाळ समाज हितासाठी होता. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मी सुरू केली. राजर्षी शाहू माहाराजांची जयंती देशात पहिल्यांदा मी साजरी केली.

Photos : मांजर समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, चिमुकलीच्या पराक्रमाने सगळेच धास्तावले

– राष्ट्रवादी नियुक्त खासदार होण्यासाठी पंतप्रधानांनी विनंती केली – संभाजीराजे

– माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलावून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. म्हणून २०१६ ला ते पद स्विकारलं. प्रथम मी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो.

– शिवदौऱ्याच्या माध्यमातून जे बहुजन समाजाला आऱक्षण दिलं होतं ते जोगृत करण्यासाठी समाजाला सांगण्यासाठी, की तुमचाही अधिका आहे, हे सांगण्यासाठी ही संधी आली होती.

– शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अतिवृष्टी असेल, कामगारांचे प्रश्न असतील, हे सगळं या दौऱ्याच्या माध्यमातून मी सर्वांना भेटू शकलो, त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळाली.

– महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो

– इतके वर्षे महाराष्ट्रातील लोकांनी या छत्रपती घराण्यावर जे नितांत प्रेम केलं या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काडू शकलो, २००७ पासून ते आतापर्यंत या दोन दशकांत एक गोंदिया जिल्हा सोडला तर मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. अनेक विषयांसाठी माझे दौरे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी माझ्याकडे ती संधी आली.

संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची स्थापना; राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here